Ad will apear here
Next
भाज्यांचे रोल्स


विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. परंतु पोळीसोबत भाजी मुलांच्या गळी उतरवणं एक अवघड काम आहे. अशा वेळी या भाज्या मुले खातील याप्रमाणे वेगवेगळ्या रेसिपीज बनवण्याकडे आईचा कल असतो. अशाच एका विविध भाज्या असलेल्या पदार्थाची रेसिपी आपण या वेळी पाहणार आहोत.... तो पदार्थ म्हणजे भाज्यांचे रोल्स...
...................

भाज्यांमधील पौष्टिक घटक मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. तेव्हा या भाज्या त्यांना आणखी वेगळ्या प्रकारात दिल्या तर ते नक्कीच आवडीने खातील. 
भाज्यांचे रोल्स ही अशीच एक चविष्ट आणि मजेशीर रेसिपी आहे. पोटभर न्याहारी म्हणून ‘भाजीचे रोल्स’ खाता येतील तसेच सर्व भाज्यांनी युक्त व चटपटीत असलेला हा रोल लहान मुलांना मधल्या वेळेत भूक लागल्यास खायलाही देता येऊ शकेल.

साहित्य :
मैदा – तीन कप, दूध – दोन कप, चवीपुरते मीठ, तूप
आतील सारणाचे साहित्य :
गाजर – दोन-तीन, मटार दाणे – अर्धी वाटी, बटाटे – पाच ते सहा, कांदे – दोन, मीठ, मिरची, आले-लसूण, कोथिंबीर, अर्धे लिंबू


कृती : 
- सर्वप्रथम बटाट्याची साल काढून बारीक फोडी कराव्यात. 
- गाजर आणि कांदाही बारीक चिरुन घ्यावेत. 
- आले, लसूण, मिरच्या वाटून घ्याव्यात.
- थोडेसे तूप एका कढईत घेऊन, त्यावर कांदा बदामी रंग येईपर्यंत परतून घ्यावा. 
- नंतर त्यात बाकीच्या भाज्या घालून अगदी थोडे पाणी घालून, त्या भाज्या शिजवून घ्याव्यात.
- भाज्या मऊसर शिजल्यानंतर त्यात मीठ, वाटलेला मसाला, लिंबाचा रस आणि  कोथिंबीर घालून भाजी तयार करून घ्यावी. 
- तयार भाजी एका थाळीत काढून ठेवावी.
- एका भांड्यात मैदा घेऊन, त्यात मीठ घालावे. ते भिजवून एक तासभर तसेच ठेवावे.
- आयत्या वेळी त्या पीठाचे डोशाप्रमाणे लहान लहान डोसे करावेत.
- प्रत्येक डोशावर वरील भाजी मध्यभागी एक डावभर अशा प्रमाणात घालून ती पसरवून घ्यावी.
- नंतर त्याची तयार डोशाप्रमाणे घडी घालावी.
- या रोलची दोन्ही कडेची टोके दुमडून घेऊन, चौकोनी घड्या घालून सर्व डोसे ठेवावेत आणि सॉससोबत खाण्यास द्यावेत.

- डॉ. वृंदा कार्येकर 
ई-मेल : kvvrunda@gmail.com

(लेखिका पुण्यातील स्त्रीरोगतज्ज्ञ असून, होलिस्टिक हेल्थ कन्सल्टंट आहेत)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZQJBG
Similar Posts
स्टीम्ड पालक वडी भरपूर पौष्टिक घटक असलेल्या पालकाची भाजी मुले खात नाहीत. याचे पराठेही मुलांना फारसे आवडत नाहीत. म्हणून मग पालकाचा एक नवीन पदार्थ खास मुलांसाठी होऊ शकतो, जो ते आवडीने खातील. आज आपण पाहू या स्टीम्ड पालक वडीची रेसिपी
भाज्यांचा पौष्टिक खिमा आज पाहू या भाज्यांचा पौष्टिक खिमा...
डाळ-तांदळाचे घावन घावन हा तसा एक प्रचलित पदार्थ आहे. साधारणतः नाश्त्यासाठी हा पदार्थ केला जातो. आहारात डाळींचे महत्त्व आहेच. याच डाळींपासून बनवलेला हा पदार्थ मुलेही आवडीने खातील.
पुदिना-कोथिंबीर पुरी पुदिना आणि कोथिंबीर या तशा एकमेकींच्या जवळच्याच पालेभाज्या. पुदिना पाचक आहे, तर कोथिंबीर पित्तशामक आहे. त्याशिवाय या दोन्हींमध्ये अनेक जीवनसत्त्वेही आहेत. या दोन्ही भाज्या एकत्रितपणे खाण्यात आल्यास अर्थातच पोषणमूल्य वाढते. त्यामुळेच आज आपण पाहणार आहोत पुदिना-कोथिंबीर पुरीची रेसिपी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language